शौचाच्या समस्यांवर प्राथमिक उपचार
सनातनची आयुर्वेदाची औषधे
‘शौचाला अधिक वेळ बसावे लागणे, तसेच जोर द्यावा लागणे, ही लक्षणे असल्यास पाव चमचा ‘सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण’, पाव चमचा ‘सनातन आमलकी (आवळा) चूर्ण’ आणि १ चिमूट सैंधव मीठ एकत्र करून अर्धी वाटी पाण्यातून दोन्ही वेळा जेवणापूर्वी घ्यावे. यामुळे वात, तसेच वरील लक्षणे न्यून होण्यास साहाय्य होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२३)