पाकिस्तानमध्ये शीख व्यापार्याची हत्या !
इस्लामाबाद – पेशावर शहरातील शीख किराणा व्यापारी दयाल सिंह यांची दुचाकी गाडीवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. दयाल सिंह यांच्यावर एकूण ३० गोळ्या झाडण्यात आल्या. दुपारी ३ च्या सुमारास दयाल सिंह त्यांच्या दुकानात होते. त्या वेळी दोघांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दयाल सिंह यांचे दुकान बाजारातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी आहे. तरीही आक्रमणकर्ते गोळीबार करून सहज पळून गेले. रस्त्याच्या कडेला पोलीस चौकीही आहे. असे असतांनाही आरोपींना पळून जाण्यास काहीच अडचण आली नाही.
पेशावरमध्ये अनुमाने १५ सहस्र शीख रहातात. हे लोक मुख्यतः जोगन शहा परिसरात रहातात. पेशावर ही खैबर पख्तूनख्वा राज्याची राजधानी आहे. या घटनेच्या १ दिवस आधी कराचीमध्ये एका हिंदु डॉक्टरची हत्या झाली होती. त्याआधी कराची शहरात एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|