(म्हणे) ‘रामनवमीच्या काळातील हिंसाचारामागे भाजपच !’ – ममता बॅनर्जी यांचा फुकाचा आरोप
कोलकाता – हावडा येथे झालेल्या हिंसाचारामागे हिंदू नाहीत, तर तो भाजपने घडवून आणलेला हिंसाचार होता, असा फुकाचा दावा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ‘हावडा येथील हिंसाचाराच्या मागे हिंदू किंवा मुसलमान असे कुणीही नव्हते. या हिंसाचारात भाजपसह बजरंग दल आणि इतर संघटना यांचा हात होता’, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ‘हावडा हिंसाचारात ज्यांच्या मालमत्तेची तोडफोड झाली त्या सर्वांना राज्य सरकारकडून साहाय्य करण्यात येईल’, असेही त्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|