भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे यांचे निधन
मुंबई – भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी, राष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या मातोश्री आणि डॉ. परिक्षित शेवडे यांच्या आजी सौ. सुमंगला शेवडे यांचे १ एप्रिल या दिवशी चेंबूर (मुंबई) येथे सकाळी १० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. सनातन परिवार शेवडे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.