(म्हणे) ‘महाराष्ट्रातील दंगलींना सनातनी कट्टरतावाद कारणीभूत !’ – जितेंद्र आव्हाड
इस्लामी धर्मांधांच्या हिंसाचाराचे खापर हिंदूंवर फोडण्याची एकही संधी न सोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड !
मुंबई, १ एप्रिल (वार्ता.) – सनातनी आपणाला अद्यापही शूद्र लेखत आहेत. बहुजनांनो, डोळे उघडा ! महाराष्ट्राला कोणत्या वाटेने नेत आहेत, हे ओळखा. सनातनी कट्टरतावादी महाराष्ट्रातील दंगलींना कारणीभूत आहेत, अशी गरळओक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ३१ मार्च या दिवशी ‘ट्वीट’ करत केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘जो वाद शाहू महाराज यांच्यासमवेत झाला, तोच वाद त्यांच्या वंशजांसमवेत होत आहे. शाहू महाराजांच्या वंशजांचे असे हाल होत असतील, तर तुम्ही-आम्ही कुठे आहोत ? सनातन धर्माविषयी मी बोंबलत आहे. अचानक हिंदु धर्म गायब करून ‘आम्ही सनातन धर्मीय आहोत’, असे सांगण्याचा प्रयत्न होत आहे. यातून कट्टरतावाद आणायचा आहे. याच सनातन धर्मियांनी जैन मुनी, बसवेश्वर महाराज यांना त्रास दिला. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आई-वडिलांना आत्महत्या करायला भाग पाडले. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार दिला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूला कारणीभूत झाले. म. ज्योतिबा फुले यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एका पुस्तकात बंद केले. वेदोक्त आणि पुराणोक्त वाद काढून ही प्रवृत्ती पुन्हा येत आहे. आपण शूद्र आहोत, हे दाखवणारी ही प्रवृत्ती आहे.’’ (सनातन हिंदु धर्माच्या कोणत्याही ग्रंथांमध्ये जातीयवाद शिकवलेला नाही. सोयीनुसार जातीयवाद हिंदु धर्माशी जोडून हिंदु धर्माची अपकीर्ती करायची; मात्र मतांच्या लांगूलचालनासाठी आणि इस्लामिक अतिरेकी कारवायांपासून मुसलमान वेगळे असल्याचे भासवण्यासाठी खटाटोप करायचा, असा लाचारपणा आव्हाड यांनाच शोभतो. ज्याने छत्रपती संभाजीराजे यांना हाल हाल करून मारले, त्या औरंगजेबाविषयी तोंडातून शब्द काढायचा नाही, इतका लाळघोटेपणा आव्हाडच करू शकतात ! – संपादक)