जिहादी आतंकवाद कि धर्मयुद्ध ?
जिहादी त्यांच्या कृत्यांमागील प्रेरणा सांगत असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे हे आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासह आत्मघात करण्यासारखेच !
१. आतंकवादी कारवायांमधील धर्मविश्वासाकडे दुर्लक्ष करणे, हे आतंकवादाला प्रोत्साहन !
‘एकदा प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांनी विचारले की, मुसलमानांची धर्मविश्वासावर एवढी श्रद्धा आहे, तर त्यात एवढे काय आहे की, जे सर्व ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसक प्रवृत्ती निर्माण करत आहेत ? दुर्दैवाने अजूनपर्यंत यावर विचार झालेला नाही. जेव्हा की, गेल्या दशकांमध्ये अल्जेरियापासून अफगाणिस्तान आणि लंडनपासून श्रीनगर, बाली, गोध्रा अन् ढाकापर्यंत जेवढ्या काही आतंकवादी कारवाया झाल्या, त्या करणारे सर्व जण इस्लामी विश्वासावरच श्रद्धा ठेवणारे होते. बहुतेकांनी कुराण आणि शरीयत यांची नावे घेत घेतच अभिमानाने या कारवाया केल्या आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे राजकीय-बौद्धिक पळपुटेपणा आहे.
कायदा आणि न्यायदर्शन यांच्या दृष्टीनेही हे अयोग्य आहे. सभ्य जगाची न्यायव्यवस्था गुन्हेगार आणि मारेकरी यांच्या साक्षीला महत्त्व देते, त्याचे अन्वेषणही होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात नाही; कारण त्यातून हत्येमागील प्रेरणा (मोटिव्ह) समजते. जेव्हा कित्येक जिहादी परत परत त्यांच्या कृत्यांमागे कुराणचा आदेश असल्याचे सांगतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे, हे आतंकवादाला प्रोत्साहन देणेच झाले. त्याने नवनवीन आतंकवादी निर्माण होणे कसे थांबतील ? जगभरात जिहादी मुसलमान स्वत:ला आत्मघातकी मानवी बाँबमध्ये कसे पालटतात ? आणि कुणाच्या प्रेरणेने ?
२. जिहादी ‘धर्मयुद्ध’ करत असतांना त्याला केवळ ‘आतंकवाद’ म्हणणे अयोग्य !
आक्रमणकर्ते त्यांच्या कृत्याला युद्ध किंवा ‘पवित्र युद्ध’ म्हणत आले आहेत; पण जिहाद्यांनी केलेल्या आक्रमणांच्या घटनांना ‘आतंकवाद’ म्हटला जातो. त्याने पीडित असलेले लोकही त्याला ‘आतंकवाद’ म्हणतात. ही तर न्यूमोनियाला हंगामी ताप म्हणण्यासारखी मूळ चूक आहे. ही रोग ओळखण्यातच चूक नाही, तर जाणीवपूर्वक केलेली चूक आहे. त्यामुळे उपाय तरी कसा निघेल ?
एक चूक दुसर्या चुकीकडे घेऊन जात आहे. आक्रमण करणारे सामान्य लोक आहेत. मनुष्य म्हणून त्यांच्यामध्ये कोणतेही निराळे वैशिष्ट्य किंवा त्रुटी आढळून आलेली नाही. मरणारे, पकडलेले किंवा त्यांच्या अड्ड्यांमधून वक्तव्य करणारे, नियतकालिके प्रकाशित करणारे, मदरसे चालवणारे, जिहादचे प्रशिक्षण देणारे, तसेच संधी मिळताच ‘आय.एस्.आय.’ (पाकिस्तानी गुप्तचर संस्था) आणि ‘सीआयए’ (अमेरिकी गुप्तचर संस्था) यांच्याशी संवाद साधणारे आणि तडजोडी करणारे हे सर्व जिहादी मुसलमान मुळात सामान्य पद्धतीने विचार करणारे, लिहिणारे अन् बोलणारे आढळून आले आहेत. असे असतांना त्यांना ‘वेडा’ किंवा ‘मनोरुग्ण’ म्हटले जाते. जेव्हा की, ते स्वत:ला ‘सैनिक’, ‘कमांडर’, ‘चीफ’, ‘शेख’, ‘खलिफा’ इत्यादी म्हणवत असतात.
३. जिहादी आतंकवाद्यांना सामान्य मुसलमानांचे समर्थन
येथे लक्षात घ्यायला हवे की, िजहादी मुसलमानांचे जगभरातील लाखो-कोट्यवधी समर्थकही सामान्य मुसलमानच आहेत. ओसामा बिन लादेन, जवाहिरी, मुल्ला उमर किंवा उमर अल् शाशनी यांचे समर्थक तसेही सामान्य मुसलमान राहिले आहेत. ओसामा बिन लादेनची छायाचित्रे असणारी खेळणी, भित्तीपत्रके, टी-शर्ट आदी पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून लोकप्रिय राहिले आहेत. सामान्य मुसलमान ते बनवायचे, विकायचे आणि खरेदीही करायचे. लक्षात ठेवा, पाकिस्तानी सरकार आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांनाही त्यात काहीच चुकीचे दिसत नव्हते. (आता खलिफा बगदादीचे छायाचित्र असणारी खेळणी, टी-शर्ट इत्यादी पाकिस्तान किंवा अरब यांच्या बाजारांमध्ये नाहीत. त्यामागे एवढेच कारण आहे की, बगदादीने सर्व मुसलमान शासकांनाही काफीर ठरवले आहे आणि त्यांनाही हटवण्याची किंवा ठार मारण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे मुसलमान सत्ताधारी बगदादीविषयी उत्साही नाहीत, तसेच त्याच्याविषयी ती उदारताही नाही, जी ओसामा बिन लादेनविषयी होती.)
तीच स्थिती काश्मीरमध्ये हुर्रियत, लष्कर, हिजबुल आदी गटांचे नेते, समर्थक आणि कार्यकर्ते यांची आहे. जे कुणी त्यांना भेटले, त्या सर्वांना दिसले की, तेही सामान्य लोक आहेत आणि इतरांसारखेच व्यवहार करतात. सिमी आणि इंडियन मुजाहिदीन यांचे लोक अन् समर्थकही अशाच प्रकारे सामान्य लोक आहेत.
४. जिहादी आतंकवाद्यांना ‘वेडे’ किंवा ‘मनोरुग्ण’ म्हणणे केवळ दुटप्पी कूटनीती !
सध्या डॉ. झाकिर नाईकचे नाव चर्चेत असते; कारण बांगलादेशचे जिहादी त्याचे समर्थक आहेत. वर्ष २००६ मध्ये मुंबईतील साखळी बाँबस्फोटांमध्ये या झाकिरचे नाव प्रामुख्याने समोर आले होते. तेव्हाही लक्षावधी मुसलमान वर्षानुवर्षे त्याचे समर्थक राहिले आहेत. आतंकवाद्यांनी त्याची संस्था ‘आय.आर्.एफ्’मध्ये बसूनच कट रचला होता आणि तो यशस्वीही केला होता. झाकीर हा लादेनचा उघड समर्थक राहिला आहे. तसेच त्याने सर्व मुसलमानांना आतंकवादी बनण्याचे महत्त्वही सांगितले आहे. त्यांच्यासाठी झाकीर हा सर्वसामान्य व्यक्ती नसून इस्लामचा लोकप्रिय विद्वान आहे. आतापर्यंत त्याच्या समर्थनार्थ कितीतरी भारतीय मुसलमान नेते, संघटना आणि विद्वान समोर आले आहेत. अर्थात् यातील कुणीही ‘वेडा’ किंवा ‘मनोरुग्ण’ नाही. तरीही प्रत्येक आतंकवादी घटनेनंतर आक्रमणकर्ते, त्यांचे प्रशिक्षक आणि संरक्षक आदींना सढळपणे ‘वेडा’ किंवा ‘भटकलेले’ संबोधले जाते. आश्चर्य म्हणजे ओसामा किंवा उमर यांचे समर्थन करणारेही आतंकवादी घटनेनंतर आतंकवाद्यांना ‘वेडे’ म्हणतात. जिहाद्यांना ‘वेडे’ म्हणणे, केवळ दुटप्पी राजकीय कूटनीती आहे. जिहादचे लक्ष्य बनणारे आणि जिहाद्यांचे समर्थक, दोघेही वेळोवेळी त्यांना ‘वेडे’ म्हणत असतात. यामागे खरे सत्य लपून रहावे, हा उद्देश असतो. सत्य उघडपणे दिसत असतांना त्याला न ओळखणे आणि त्यानुसार उपाययोजना न करणे आश्चर्यकारक आहे.
५. जिहादी आतंकवादामागील प्रेरणा ओळखून त्याप्रमाणे उपाय करणे आवश्यक !
जिहादींच्या घोषणा, कागदपत्रे, त्यांना प्रेरित करणारी पुस्तके अशा प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या अक्षरांमध्ये लिहिले आहे की, ‘जोपर्यंत जगातील सर्व भूमी अल्लाची होणार नाही, तोपर्यंत काफिरांविरुद्ध धार्मिक युद्ध करणे’, हा त्यांचा उद्देश आहे. त्यांना केवळ प्रेरणाच नाही, तर स्वत: प्रेषित महंमद यांनी कायमस्वरूपी आदेश देऊन ठेवला आहे, ‘जे मुसलमान हे विसरले आहेत, ते स्वत: काफीर आणि मृत्यूसाठी लायक आहेत.’ त्यामुळे ‘पाकिस्तानी तालिबान’पासून ‘इसिस‘पर्यंत अनेक जिहादी संघटनांनी मुसलमान शासकांनाही लक्ष्य केले आहे.
जिहाद हे राजकीय युद्ध आहे. संपूर्ण इस्लामी इतिहास आणि त्यांची मूळ पुस्तके यांमधून त्याची सहजपणे पुष्टी होते. त्यात न समजण्यासारखे काही नाही, जे समजून घेण्यासाठी ठराविक संस्था किंवा शिक्षक यांच्याकडे जावे लागेल. कमीत कमी मूलभूत गोष्टींविषयी कुठेही आणि कोणतीही अडचण नाही. जसे ‘इस्लाम एकमात्र सत्य आहे’, ‘प्रेषित महंमद सर्वश्रेष्ठ प्रेषित होते आणि त्यांची अवज्ञा किंवा अवमान यांची शिक्षा मृत्यूदंड आहे,’ ‘महंमद यांच्याकडून करण्यात आलेला व्यवहार प्रत्येक मुसलमानांसाठी अनुकरणीय आणि कायदा आहे,’ ‘कुराण अल्लाचे शब्द आहेत, जे यावर शंका घेईल, त्याला मृत्यूदंड द्या’, ‘मूर्तीपूजक आणि देवीदेवता यांना मानणारे लोक सर्वाधिक वाईट आणि घृणास्पद असतात’, ‘सर्व जगाला इस्लामच्या झेंड्याखाली आणायचे आहे; पण इस्लाम सोडण्याची शिक्षा मृत्यू आहे’, ‘जिहाद लढणे मुसलमानांचे सर्वांत पवित्र कर्तव्य आहे’, ‘जिहादच्या मार्गात मरणारा त्याच क्षणी जन्नतमध्ये (स्वर्गात) जातो, जेथे सर्व ईश्वराची देण (नियामते) त्याच्यासाठी सिद्ध असतात.’ या मूलभूत गोष्टींविषयी मुसलमान विद्वानांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. जे व्याख्यात्मक मतभेद आहेत, ते यानंतर आहेत. हे इस्लामी आदेश, उदाहरणे यांना कसे, कुठे आणि किती लागू करावे इत्यादी.
सुदैवाने बहुतांश मुसलमान वरील गोष्टींना सैद्धांतिकपणे मान्य करत असले, तरी ते व्यवहारामध्ये त्याला अक्षरश: लागू करण्यात रस ठेवत नाहीत. उदरनिर्वाह, मुलेबाळे, आनंद मिळवणे, काबाड कष्ट करणे इत्यादी गोष्टी करण्यातच त्यांचा संपूर्ण वेळ निघून जातो; पण जो कुणीही मुसलमान त्या गोष्टींना हृदयाशी लावेल, त्याच्यासाठी अल् कायदा किंवा इस्लामी स्टेट अतिशय महत्त्वाचे वाटतात. किशोरवयीन आणि युवा आदर्शवादी असतात. त्यामुळे त्यांना या गोष्टी भावल्या, तर ते इस्लामी स्टेटचा मार्ग धरतात किंवा त्यांना साहाय्य करू लागतात.
ही स्थिती उघड दिसत असतांनाही ती न ओळखणे, हीच मागील ३ दशकांपासून परिस्थिती बिघडायला कारणीभूत आहे. काही धर्मांधांनी मुसलमानेतरांच्या विरोधात आणि सर्व जगावर कुराणचे शासन लागू करण्यासाठी युद्ध छेडले आहे. हे युद्ध लढणार्या संघटना, कमांडर आणि कार्यकर्ते यांच्यात पालट होत असतो; परंतु युद्धाची घोषणा, त्यांचे लक्ष्य, पद्धत इत्यादींमध्ये पालट होत नाही. जर संपूर्ण घटनाक्रमाला किंवा आजाराला स्पष्टपणे ओळखून उपाय केला असता, तर उपचार अगदी सोपा होता.
६. आतंकवाद हे इस्लामला प्राप्त करण्यासाठीचे साधन
कुणी युद्ध छेडले, तर त्याच्याशी लढणे आवश्यक आहे. आक्रमणकर्ते, तसेच त्यांच्या बाह्य आणि अंतर्गत समर्थकांवरही शत्रू समजून कारवाई केली पाहिजे. त्यांच्याकडून देण्यात येणारी कारणे, लक्ष भरकटवणे, तडजोडी किंवा विराम यांचे नाटक इत्यादी गोष्टी योग्य प्रकारे ओळखणे आवश्यक आहे. त्यातील खरे-खोटे शोधून जिंकण्यासाठी प्रयत्न करावे. लक्षात ठेवा, युद्धात जिंकण्याखेरीज दुसरे लक्ष्य नसते. ते सोडून दुसरे लक्ष्य ठेवणे, हे स्वतःला नष्ट करण्यासारखे आहे. या युद्धाचे चरित्र मुख्यत: मानसिक आहे. सर्व जिहादी नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना वैचारिक भूमीवर एकत्र केले आहे. सर्वांचे पुस्तक एक आहे; दुसरी कारणे गौण आहेत. शेवटी ती भूमी डळमळीत केल्याखेरीज त्यांना कमकुवत करता येणार नाही. त्यामुळे मोठमोठ्या जिहादी संघटना आणि त्यांचे म्होरके नष्ट झाल्यावरही नवनवीन पुढे येत असतात. त्यांची बाँब, बंदूक, जहाज, स्फोटके भरलेल्या गाड्या इत्यादी साधने आहेत. त्यामुळे मूळ समस्या आतंकवाद नसून ‘इस्लामला प्राप्त करण्यासाठी ते केवळ एक साधन आहे’, म्हणजे आतंकवाद केवळ रणनीती आणि कार्यनीती आहे, मुख्य शत्रू नाही.
ज्याप्रमाणे दोन देशांच्या युद्धात क्षेपणास्त्रे, बाँबवर्षाव करणारी विमाने आदी युद्धाची साधने असतात, त्याप्रमाणे इस्लामवाद नावाच्या बाजूने आतंकवादी हेही केवळ एक साधन आहे. ते मुसलमानेतर जग आणि मुसलमान यांच्यातील तटस्थांना त्यांच्या इच्छेप्रमाणे वाकवण्याचे एक शस्त्र आहे. त्यांची दुसरी शस्त्रेही आहेत, जी त्याच उद्देशाने वापरण्यात येतात. विविध प्रकारचे फतवे आणि तालिबान यांच्यासारखे राज्य, प्रत्येक ठिकाणी शरीयत कायद्याचा आग्रह, मदरशांमधील अभ्यासक्रम आणि त्यांच्यातील पालट, तस्लिमा नसरीनला विरोध, यहुदींना विरोध, लोकसंख्येचा दबाव, इस्लामिक बँकींग, स्थलांतर नीती इत्यादीही त्याच उद्देशाची शस्त्रे आहेत. अगदी सहजपणे दिसेल की, हे सर्व करणारे आणि मानणारे जिहादींविषयी सद्भाव ठेवतात आणि कधी त्यांचा निषेधही करत नाहीत.
७. इस्लामची विचारसरणी आणि उद्देश यांना चुकीचे म्हणण्याचे धारिष्ट्य दाखवणे आवश्यक !
मुळात सर्व लढाई इस्लामी विश्वासांची आहे. त्यांच्याशीच लढावे लागेल. कुराणच्या गोष्टी, प्रेषितांचे ते काम, त्यांचे आदेश, उदाहरण, कायदा आणि जन्नत (स्वर्ग) आदी सर्व मानवी कल्पना आहेत. ही गोष्ट आणि वादविवाद परत परत होत असतात. कुराणच्या गोष्टींची पात्रता तेव्हाही हीच होती, जेव्हा ती प्रथमत: सांगण्यात आली होती. त्यांना अरबांनी एकदाही स्वेच्छेने स्वीकारले नव्हते. महंमदाचे प्रेषित असल्याविषयी शंका घेणे आणि त्यांच्या गोष्टींना ‘वेडा’ किंवा ‘कवी’ची कल्पना म्हणण्याचे काम महंमदांच्या समकालिकांनी केले होते. त्याविषयी कुराणमध्येच अनेक उल्लेख आहेत. विचार आणि पुरावे यांनी प्रभावित न करता केवळ तलवारीच्या बळावरच प्रेषिताचा विजय झाला होता.
अशाच प्रकारे ७ व्या शतकातही इस्लामी सिद्धांतांना योग्य समजून कुणी स्वीकारले नव्हते, हे प्रेषिताचे सर्व अधिकाधिक जीवनचरित्र आणि संपूर्ण इतिहास स्वत:च सांगतो. तेव्हा अशी विचारसरणी, मतवाद आणि उद्देश यांना आज अयोग्य म्हणण्यात काय चूक आहे ? काहीच नाही ना ? भावनांच्या नावावर गप्प बसणे, हा केवळ मूर्खपणा आहे. हे तर युद्ध छेडणार्याच्या चालीमध्ये फसण्यासारखे झाले. तसेही जो अन्य विचार, पंथ, श्रद्धा, देवीदेवता यांना खोटे ठरवतो, त्याच्या धर्माला खोटे म्हणण्यात काय अनुचित आहे ? तसेही जेव्हा इस्लामच्या कोणत्याही गोष्टीसाठी ७ व्या शतकात कोणताही पुरावा नव्हता आणि आजही नाही. तेव्हाही तलवार, छळकपट, दमन आणि युद्ध यांनी काम चालवले होते, आजही तलवार अन् धमक्या हेच प्रत्येक गोष्टीचे उत्तर असते. मुसलमानेतरच नाही, तर मुसलमानांनाही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ठार मारण्याचा प्रयत्न किंवा धमकी यांनीच दिले जाते. त्यांच्याकडे रश्दी यांच्यापासून वफा, अय्यान, तारिक, तस्लिमा आदी सर्वांच्या शंकांचे एकच उत्तर आहे, ‘मारून टाका !’ या विचारसरणीची मुळे नष्ट करणे किंवा न्यून करणे आवश्यक आहे. चर्चेचे उत्तर चर्चेने द्या, मृत्यूच्या धमकीने नाही.
८. धर्मयुद्ध जिंकण्यासाठी वैचारिक आणि धार्मिक तानाशाहीला आव्हान देणे आवश्यक !
आपल्या ‘भावनां’ची गोष्ट करण्यापूर्वी मूळ इस्लामी पुस्तकांमध्ये असलेल्या यहुदी, ख्रिस्ती, हिंदु आणि बौद्ध यांच्या भावनांना चिरडणार्या सर्व गोष्टींना उघडपणे फेटाळून लावले पाहिजे. विविध मतांचे सहअस्तित्व लाचारीमध्ये नाही, तर सिद्धांताच्या रूपात घोषित करा. त्याची उघड मागणी, प्रचार, तसेच इस्लामी मान्यता यांना कल्पना असल्याचे सांगितले पाहिजे. वास्तविक असे समजणारे मुसलमानही मोठ्या संख्येने आहेत; पण त्यांना समोर येण्याची सवलत नाही. त्यांना इस्लाममधून बाहेर पडण्याची उघड सवलत घोषित करण्याचीही आवश्यकता आहे.
इस्लाममध्ये येण्याचा मार्ग आहे; पण त्याच्या बाहेर जाण्याचा नाही, या तानाशाहीला धुडकवावे लागेल. ७ व्या शतकातील आग्रह २१ व्या शतकात आणि तेही हिंसाचाराच्या बळावर चालू देणे, ही सर्वांत मोठी चूक आहे. शेवटी या संपूर्ण वैचारिक-धार्मिक तानाशाहीला उघड आव्हान देणे आणि त्याला चुकीचे ठरवणे, हे या युद्धाला जिंकण्याचे पहिले शस्त्र आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच नवनवीन बाळबोध जिहादमध्ये प्रवेश करत असतात. हे त्यांच्या वक्तव्यावरून आरशाप्रमाणे स्पष्ट समोर आले आहे. इस्लामी विचारसरणी अतिशय कमकुवत असून सहजपणे तुटू शकते. याचे रहस्य प्रत्येक गोष्टीवर येणार्या धमक्यांमध्ये आहे. सत्य तुटण्याचे भय; म्हणून हिंसाचाराची आवश्यकता नसते. हे युद्धाच्या दोन्ही बाजूंना समजण्याची आवश्यकता आहे.’
– डॉ. शंकर शरण
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, हिंदी)