आज वाशी येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ !
नवी मुंबई, १ एप्रिल (वार्ता.) – भारतीय जनता पक्षाच्या वतीने २ एप्रिल या दिवशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. वाशी येथील ब्लू डायमंड हॉटेल येथून या गौरव यात्रेचा प्रारंभ दुपारी २ वाजता होणार असून सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे, अशी माहिती आमदार गणेश नाईक यांनी दिली.
माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, विविध सामाजिक, धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, सांस्कृतिक मंडळांचे सदस्य, तसेच सावरकरप्रेमी यात्रेमध्ये सहभागी होणार आहे.
वीर सावरकर यांनी केलेले सर्वोच्च बलीदान, त्याग आणि सोसलेल्या अनंत यातना यांविषयीची माहिती तरुण पिढीला करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर गौरव यात्रांचे आयोजन करण्यात येथे आहे आहे. ३१ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीमध्ये या गौरवयात्रा राज्यभर आयोजित करण्यात येत आहेत. भाजपच्या स्थापनादिनी म्हणजे ६ एप्रिल या दिवशी गौरव यात्रेचा समारोप होईल.