स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री करणार्या ३ धर्मांधांसह एकाला अटक !
पुणे – स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधील गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्री करणार्या चौघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. रफीक शेख, सद्दाम शेख, जमीर शेख, देवीसिंग राजपुत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ११४ गॅस सिलिंडर, पाईप, रेग्युलेटर, टेंपो असा १७ लाख २२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वडगाव बुद्रूक भागातील तुकाईनगर येथील मंगल रिढे यांच्या खोलीमध्ये भरलेल्या गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून गॅस पाईपद्वारे काढून रिकाम्या टाकीत भरण्यात येत होता. ही माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाल्यानंतर तेथे पोलिसांनी धाड टाकली.
संपादकीय भूमिकागुन्हेगारीत आघाडीवर असणारे धर्मांध ! |