पगार देणारी नोकरी आणि आनंद देणारी सेवा !
‘सनातन संस्थेमध्ये विद्यावाचस्पती (पीएच्.डी.), आधुनिक वैद्य, अभियंते यांसारखे उच्च विद्याविभूषित साधक त्यांची नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करत आहेत. नोकरीमध्ये त्यांना प्रतिदिन ८ – १० घंट्यांच्या कामासाठी प्रतिमास सहस्रो रुपये पगार मिळत होता. सनातन संस्थेमध्ये नोकरीप्रमाणे पगार मिळत नसला, तरी हे साधक प्रतिदिन स्वतःहून नोकरीपेक्षा अधिक घंटे सेवा करतात. याचे कारण हे की, त्यांना नोकरीच्या ठिकाणी असणार्या रज-तमयुक्त कामापेक्षा सत्त्वगुणी सेवा करणे अधिक आनंद देते. या आनंदापुढे त्यांना सहस्रो रुपये नगण्य वाटतात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१०.२०२१)