बिहारमध्ये अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांकडून रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे
|
पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या सासाराम, नालंदा आणि भागलपूर येथे रामनवमीच्या मिरवणुकांवरून, तसेच देवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्या हिंदूंवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केल्याच्या घटना घडल्या. सासाराम येथे पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले, तर बिहारशरीफ येथे भाजपच्या नेत्याच्या एका दुकानातून ३ कोटी रुपयांचे साहित्य धर्मांध मुसलमानांकडून लुटण्यात आले. याचे सीसीटीव्ही चित्रीकरण सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा सासाराम येथील दौरा रहित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘या हिंसाचाराची चौकशी करण्यात येईल’, असे म्हटले आहे. कुणीतरी जाणीवपूर्वक या घटना केल्याचा आरोप त्यांनी केला. (धर्मांधांनी हिंसाचार केल्याचे धडधडीत दिसत असतांना मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य करणे; म्हणजे त्यांना पाठीशी घालण्याचा हा हीन प्रकार आहे ! – संपादक) या दंगलीच्या प्रकरणी ८० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
बिहार-बंगाल में बढ़ा बवाल, धारा 144 लागू: पथराव रोकने के लिए सुरक्षाबल तैनात, कट्टरपंथियों ने हिंदुओं के घर-दुकानों में आग लगाई#Bihar #Bengal #Violencehttps://t.co/2142IVPpRI
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 31, 2023
१. भागलपूरच्या खारिक भागात चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने स्थापन केलेल्या देवीच्या मूर्तीचे विसर्जन करून हिंदू परतत असतांना धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले.
२. बिहारशरीफ येथील दीवानगंज भागात रामनवमीची मिरवणूक पोचल्यावर धर्मांध मुसलमानांनी त्यावर दगडफेक केली, तसेच येथील हिंदूंच्या घरात आणि दुकानांत घुसून तोडफोड, जाळपोळ केली. या वेळी त्यांच्याकडून गोळीबारही करण्यात आला. यात ४ जण घायाळ झाले. संपूर्ण हिंसाचारात १० हून अधिक जण घायाळ झाले. येथे कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकासध्या मुसलमानांचा पवित्र रमझान मास चालू आहे. या काळात त्यांच्यातील धर्मांधांकडून अशा प्रकारे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर करण्यात आलेल्या हिंसाचाराचा कोणत्याही मुसलमान नेत्याने, धर्मगुरूने, संघटनेने किंवा पक्षाने निषेध केलेला नाही, हे लक्षात घ्या ! |