जमशेदपूर (झारखंड) येथे रामनवमीच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार
रांची (झारखंड) – रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांच्या वेळी बंगाल, बिहार, तसेच महाराष्ट्र राज्यांत धर्मांध मुसलमानांनी घडवून आणलेला हिंसाचार आता हळूहळू भारतातील इतर राज्यांमध्येही पसरत आहे. ३१ मार्च या दिवशी झारखंडच्या जमशेदपूर येथील जुगसलाई भागात रामनवमीच्या मिरवणुकीला विरोध करत धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली. या वेळी त्यांनी रस्त्यावर टायर जाळले आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली.
(सौजन्य : ABP NEWS)
पोलीस अधीक्षक आणि जिल्हादंडाधिकारी यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रामनवमीची मिरवणूक थांबवल्याने हिंदूही संतापले. त्यांनी येथील बाटा चौकात हनुमान चालिसेचे पठण चालू केले, तसेच रेल्वे स्थानकावरील पूल जाम केला.
Jharkhand | Stones were pelted during a Ram Navami immersion procession in Jamshedpur’s Haldipokhar area yesterday.
Around 5 people got injured. The situation is peaceful now, say police pic.twitter.com/oaSg8Qu4oB
— ANI (@ANI) April 1, 2023
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या उत्सवांना गालबोट लावण्यामागे धर्मांध मुसलमानांपेक्षा त्यांना आवरण्याची क्षमता नसलेले पोलीसच उत्तरदायी आहेत, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? |