भाग्यनगर येथे रामनवमीच्या मिरवणुकीनंतर धर्मांधांकडून हिंदूंना मारहाण
भाग्यनगर (तेलंगाणा) – रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर येथे चारमीनार भागात एका मशिदीबाहेर हिंदूंकडून शांतता भंग करण्यात येत असल्याचा आरोप करत मुसलमानांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला.
👆at Patthergatti, Charminar last night incident in shoba yatra. @KapilMishra_IND @KapilMishra_IND @ShefVaidya @vivekagnihotri pic.twitter.com/IVoGOwGM7p
— Abhishek Agarwal 🇮🇳 (@AbhishekOfficl) March 31, 2023
मुसलमानांची म्हणणे आहे की, मशिदीमध्ये नमाजपठण चालू असतांना बाहेर गोंधळ घालण्यात येत असल्याने शांतता भंग होत होती. त्यातून वाद होऊन हाणामारी झाली.
भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांच्यावर कथित आक्षेपार्ह विधानावरून गुन्हा नोंद
भाग्यनगरच्या गोशामहल मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी येथे काढलेल्या रामनवमीनिमित्तच्या मिरवणुकीनंतर झालेल्या सभेत कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी ‘हम दो आणि हमारे दो’ यांनाच मतदानाचा अधिकार आहे. ‘हम पांच आणि हमारे पचास’ यांना मतदानाचा अधिकार नसणार आहे’, असे टी. राजा सिंह यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या देशात हिंदूंच्या धार्मिक सणांच्या मिरवणुकांवर देशात अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे केली जातात आणि निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, मानवाधिकारवाले सारे काही शांत आहेत; मात्र जर हिंदूंनी अन्य धर्मियांवर आक्रमण केल्याची अफवा जरी पसरली, तरी हेच सर्वजण हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवण्यासाठी एकसाथ बाहेर पडतात, हे लक्षात घ्या ! |