अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील विधानसभेत हिंदुद्वेषाची निंदा करणारा प्रस्ताव संमत !

नवी देहली – अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या विधानसभेमध्ये हिंदुद्वेषाची निंदा करणारा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. असे करणारे जॉर्जिया अमेरिकेतील पहिले राज्य आहे. हा प्रस्ताव लॉरेन मॅकडॉनल्ड आणि टॉड जोन्स या सदस्यांनी सादर केला होता.

या प्रस्तावामध्ये म्हटले आहे की, हिंदु धर्म जगातील सर्वांत मोठा आणि सर्वांत प्राचीन धर्मांपैकी एक आहे. याचे १ कोटी २० लाखांहून अधिक अनुयानी १०० हून अधिक देशांमध्ये रहात आहेत. चिकित्सा, विज्ञान आणि अभियांत्रिकी, माहिती आणि तंत्रज्ञान, आतिथ्य, अर्थ, शिक्षण, ऊर्जा, व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये अमेरिकेतील हिंदूंचे प्रमुख योगादन आहे. तसेच योग, आयुर्वेद, ध्यान, भोजन, संगीत, कला यांतील योगदानाने संस्कृतीला समृद्ध केले आहे. याला अमेरिकेच्या समाजाने व्यापक स्वरूपात स्वीकारले आहे. हिंदुद्वेषाला काही शिक्षणतज्ञांकडून एक वेगळे रूप देण्यात आले. त्याच्या कृती या  हिंदु धर्माला नष्ट करण्यास समर्थन करणार्‍या होत्या आणि त्यांच्याकडून हिंदूंच्या पवित्र ग्रंथांवरही आरोप करण्यात आले.

संपादकीय भूमिका

जॉर्जिया राज्याच्या विधानसभेचे हिंदूंकडून आभार ! जेथे हिंदूंचा द्वेष करण्याचा प्रयत्न एका षड्यंत्राद्वारे केला जातो, अशा ठिकाणी असा प्रयत्न सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे !