ओहर (छत्रपती संभाजीनगर) गावात धर्मांधांकडून दगडफेक; दंगल करण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर – येथून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओहर गावात हिंदू आणि धर्मांध यांच्यामध्ये वाद होऊन दगडफेक करण्यात आली. येथे परिस्थिती चिघळत असतांनाच पोलिसांनी तात्काळ गावात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने माध्यमांना सांगितले. या वेळी झालेल्या दगडफेकीत ६ जण घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त ओहर गावात ठेवण्यात आला आहे.
(सौजन्य : ABP MAJHA)
छत्रपती संभाजीनगर दंगलीत एकाचा मृत्यू; ७ जणांना अटक
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीमध्ये ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून ४०० पेक्षा अधिक लोकांवर शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येथे शीघ्र कृती दलासह (रॅपिड अॅक्शन फोर्ससह) प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणी अफवा पसरवत असल्यास ११२ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दंगल पूर्वनियोजित ! – संजय शिरसाट, आमदार, शिवसेना
ही दंगल पूर्वनियोजित असून याविषयी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आढावा घेऊ.
(सौजन्य : TV9 Marathi)
खासदार इम्तियाज जलील या दंगलीमागे ‘बटण गँग’ आहे, असे सांगतात, तर ती टोळी कुठली आहे, हेही त्यांनी पोलिसांना सांगावे.