५२ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मडगाव, गोवा येथील कु. श्रद्धा महादेव रसाळ (वय ८ वर्षे) !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. श्रद्धा महादेव रसाळ ही या पिढीतील एक आहे !

चैत्र शुक्ल एकादशी (१.४.२०२३) या दिवशी मडगाव, गोवा येथील कु. श्रद्धा महादेव रसाळ हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. श्रद्धा रसाळ

कु. श्रद्धा महादेव रसाळ हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. नामजपाची आवड : ‘कु. श्रद्धा १ मासाची असतांना आम्ही भ्रमणभाषवर भजने आणि नामजप लावल्यावर ती लक्ष देऊन ऐकत असे. ती वयाच्या तिसर्‍या वर्षापासून बसून नामजप करण्याचा प्रयत्न करते.

सौ. कविता रसाळ

२. देवाशी बोलणे : श्रद्धा बोलायला लागल्यापासून ती सूक्ष्मातून देव, श्रीकृष्ण आणि परम पूज्य यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. ती देवाच्या अनुसंधानात रहाते. ती शाळेत गेल्यावरही भगवंताशी बोलण्याचा प्रयत्न करते. ‘तिला भगवंत साहाय्य करतो’, याची जाणीव होते.

३. आनंदी : ती नेहमी आनंदी असते. ती शाळेतील सर्व स्पर्धांत उत्साहाने सहभागी होते.

४. समंजस : ती कोणत्याही वस्तूसाठी हट्ट करत नाही. ती आई-बाबांनी सांगितलेले ऐकते.

५. प्रेमभाव : ती सर्वांशी प्रेमाने वागते.

६. धर्माचरण करणे आणि सात्त्विकतेची आवड : तिला सर्व सण साजरे करायला आवडतात. तिला सात्त्विक वस्तूंची पुष्कळ आवड आहे.

७. व्यवस्थितपणा : ती प्रत्येक कृती सुंदर करण्याचा प्रयत्न करते. ती तिच्या सर्व वस्तू आणि कपडे व्यवस्थितपणे सांभाळते.

८. ती काटकसरी आहे.

९. ती प्रतिदिन नामजप करते आणि लिहूनही काढते. ती स्तोत्रे आणि श्लोक म्हणते.

१०. ती स्वभावदोष सारणी लिहिते.

११. भाव : एखादी कृती करतांना (शाळेतील) तिला अडथळा आल्यास ती सूक्ष्मातून श्रीकृष्णाशी बोलते आणि कृती पूर्ण करते. तेव्हा ‘श्रीकृष्णाने साहाय्य केले; म्हणून कृती पूर्ण झाली’, असे तिला वाटते.

१२. कु. श्रद्धाला आलेल्या अनुभूती

अ. एकदा आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा एका साधिकेने श्रद्धाला विचारले, ‘‘श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून काय जाणवले ?’’ तेव्हा श्रद्धाने सांगितले, ‘‘श्रीकृष्ण माझ्याकडे पाहून ‘तथास्तु’ म्हणत आहे’, असे जाणवले. ’’

– सौ. कविता महादेव रसाळ (कु. श्रद्धाची आई) मडगाव, गोवा. (१७.३.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.