उरूस अथवा रमझानला भगवद्गीतेचे पठण कधी झाले आहे का ? – गुरुप्रसाद गौडा, हिंदु जनजागृती समिती
बेलुरू (कर्नाटक) येथील रथोत्सवात नमाजपठण करण्याची धर्मविरोधी परंपरा
(उरूस म्हणजे मुसलमानांचा उत्सव)
बेलुरू (कर्नाटक) – येथील सुप्रसिद्ध चन्नकेश्वर देवालयात पिढ्यान्पिढ्या रथोत्सव होत आहे; परंतु या धार्मिक रथोत्सवात काही दशकांपूर्वी कुराणाचे पठण करण्याची हिंदु धर्मविरोधी प्रथा घुसवण्यात आली. ही अयोग्य प्रथा असून हिंदु जनजागृती समिती त्याचे खंडण करत आहे, असे वक्तव्य समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
या निवेदनात श्री. गौडा यांनी म्हटले की,
१. चन्नकेश्वर देवाला कुराणाच्या पठणाची आवश्यकता नाही.
२. डॉ. रमेश या प्रसिद्ध लेखकाने ‘बेलुरू चन्नकेशवाला कुराणपठण नको !’ असे त्यांच्या अलीकडील पुस्तकात स्पष्ट केले आहे.
३. हिंदूंच्या देवस्थानात कोणत्या प्रथा असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात, हे ठरवण्याचा अधिकार केवळ हिंदु भक्तांना आहे.
४. कोणत्याही उरूसात अथवा रमझानच्या वेळी भगवद्गीता पठण केल्याचे पाहिले आहे का ? हिंदु समाज आता जागृत होत आहे. त्यामुळे कुणीतरी घुसडलेली ही अयोग्य प्रथा हिंदू यापुढे सहन करणार नाहीत.
५. एप्रिलमध्ये असलेल्या मंदिराच्या रथोत्सवाच्या वेळी कोणत्याही कारणाने कुराण पठण करण्याची संधी देऊ नये, असा आग्रहही भूमिकाही गौडा यांनी या वेळी मांडली.