मुसलमान पत्नीने सासरच्या कुटुंबियांवर धर्मांतर करण्यासाठी आणला दबाव !
|
अलीगड (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील फिरोजपूर या मुसलमानबहुल भागात रहाणार्या एकमेव हिंदु कुटुंबावर त्यांच्याच मुस्कान नावाच्या मुसलमान सुनेने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. यासाठी तिने घरात चैत्र नवरात्रात पूजण्यात आलेल्या देवीच्या मूर्तीला खंडित केले, तसेच ती मांसाहारी पदार्थ बनवण्याचा आग्रह करू लागली. मुस्कानच्या माहेरच्या लोकांनीही यासाठी तिची बाजू घेतली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्कानचा हिंदु पती अजय कुमार यांनी मुस्कान आणि तिच्या माहेरचे लोक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.
अलीगढ़ में हिंदू पति पर धर्म परिवर्तन का दबाव बना रही मुस्लिम पत्नी सहित पांच लोगों पर केस दर्ज किया गया है.#ReligiousConversion #Aligarh https://t.co/7N6wQ346bU
— ABP Ganga (@AbpGanga) March 30, 2023
१. फिरोजपूर येथील मुसलमान महिलांनी मुस्कानला सासरच्या कुटुंबियांच्या विरोधात फूस लावल्याचा आरोपही कुमार यांनी केला आहे.
२. कुमार यांनी डिसेंबर २०२२ मध्ये मुस्कानबरोबर प्रेमविवाह केला होता.
३. सामाजिक माध्यमांत घरात झालेल्या एका भांडणाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. बहुदा अजय कुमार यांनीच हा व्हिडिओ बनवला असून त्यामध्ये ते वारंवार सांगत आहेत की, ‘आम्ही मरण पत्करू, परंतु धर्मांतर करणार नाही !’ मुस्कान कुटुंबियांना धमकावत असल्याचेही यात दिसत असून ‘धर्मांतर केले नाही, तर सर्वांना मरावे लागेल’, असे ती म्हणत आहे.
संपादकीय भूमिका
|