स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाचे मोल होऊ शकत नाही ! – गोवर्धन हसबनीस
सांगली – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रासाठी कारागृहवास पत्करला, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, असह्य वेदना सहन केल्या. त्यामुळे कुणी कितीही आरडा-ओरडा केला, तरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाचे मोल होऊ शकत नाही, असे मनोगत भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष श्री. गोवर्धन हसबनीस यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करत असून त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीच्या वतीने शिवतीर्थ, मारुति चौक येथे प्रतिकात्मक निषेध आंदोलन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार श्री. नितीनराजे शिंदे, स्थायी समितीचे सभापती श्री. धीरज सूर्यवंशी, मनपाच्या गटनेत्या सौ. भारती दिगडे, नगरसेविका सौ. स्वाती शिंदे, अधिवक्ता बाळासाहेब देशपांडे, भाजप सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल, अपर्णा गोसावी, शुभम कुलकर्णी, सुहास कलघटगी, योगेश कोल्हटकर यांसह विविध संघटना, स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी यांनी आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.