जोतिबा यात्रेसाठी (जिल्हा कोल्हापूर) नारळाची सोडण काढूनच विक्री करण्याचे आदेश !
कोल्हापूर – दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या जोतिबा यात्रेच्या कालावधीत नारळाच्या सोडणाने कचरा होऊ नये यांसाठी नारळाची सोडण काढूनच त्याची विक्री करण्याचे आदेश पन्हाळा तहसीलदारांनी काढले आहेत.
Jotiba chaitra yatra : जोतिबा यात्रेत शेंड्या काढूनच नारळ विक्री, प्रशासनाचा आदेश; डोंगर मार्गावर दुतर्फा पार्किंगला मनाई https://t.co/TcjzFDsdQG
— ABP माझा (@abpmajhatv) March 29, 2023
हे आदेश व्यापारी आणि पुजारी दोघांनाही बंधनकारक असून हे आदेश ३ ते ६ एप्रिल या कालावधीत लागू करण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत जिल्हाधिकार्यांनी वाहतूक नियमन आदेश जारी केले असून डोंगर मार्गावर दोन्ही बाजूस गाड्या थांबवण्यास, तसेच त्या थांबवून ठेवण्यासही (पार्कींग करण्यास) मनाई करण्यात आली आहे.