पिंपरी-चिंचवडमध्ये (पुणे) ‘आम्ही सारे सावरकर’ फ्लेक्सची चर्चा !
पिंपरी (जिल्हा पुणे) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ आणि सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या वतीने ‘आम्ही सारे सावरकर’ ही मोहीम चालू करण्यात आली आहे. त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ‘फेसबुक’वर ‘मी सावरकर प्रेमी’ असे ‘स्टेट्स’ ठेवले होते. त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये उमटत आहेत. त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवडमध्येही ‘आम्ही सारे सावरकर’ या आशयाचे फलक विविध ठिकाणी लावले आहेत. शहरात झळकणार्या या फलकांची चर्चा होत आहे.
या संदर्भात अमित गोरखे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्याची होळी करणारे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. तसे करून करोडो देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
जाज्वल्य देशभक्त,
'1857 चे स्वातंत्र्य समर' गाथाकार,
जात्युच्छेदक,
प्रखर हिंदुत्ववादी
या सर्व शब्दांचा अर्थ एकच… 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर'…सावरकर गौरव यात्रा तुमच्या दारी!
…तुम्हीही सामील व्हा!#VeerSawarkar pic.twitter.com/E2zf2cjeS5— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 30, 2023
त्यामुळे ‘आम्ही सारे सावरकर’ अभियान चालू करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आमच्या या स्वातंत्र्यवीरांचा जाणीवपूर्वक होणारा अवमान यापुढे सहन केला जाणार नाही.