नागोठणे (जिल्हा रायगड) येथील नवीन रामेश्वर मंदिर येथे श्री रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा !
नागोठणे – येथील नवीन रामेश्वर मंदिरात श्री रामनवमी उत्सव उत्साहात पार पडला. या वेळी जन्मोत्सवानिमित्त सौ. ज्ञानदा बुरसे-पंडित यांचे उद्बोधक कीर्तन झाले. सौ. ज्ञानदा बुरसे-पंडित या स्वतः उच्चशिक्षित असूनही मोठ्या वेतनाच्या चाकरीचा पर्याय न निवडता त्यांनी किर्तन सेवेतून धर्मप्रसाराचा मार्ग निवडला आहे. सौ. छाया भिडे, सौ. जया सहस्रबुद्धे आणि सौ. प्राची लिमये यांनी या वेळी श्रीरामाचा पाळणा गायला.
जन्मोत्सवाच्या सोहळ्यासाठी मंदिराचे अध्यक्ष श्री. राजन उपाध्ये, तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री. मंदार परांजपे, श्री. केदार कुंटे, श्री. रवींद्र भिडे आदींचे सहकार्य लाभले. या वेळी भाजपच्या सौ. श्रेया कुंटे, तसेच गावातील महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.