सातारा जिल्ह्यात कोरोनाचे २२ रुग्ण !
सातारा, ३० मार्च (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास प्रारंभ केला असून जिल्हा रुग्णालयात सध्या ४ तर, खासगी रुग्णालयात १ रुग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे, तसेच कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोना
मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. शंभूराज देसाई यांनी ट्विट करत माहिती दिली. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोविड चाचणीचा सल्ला दिला आहे.@shambhurajdesai #ShambhurajDesai #Shivsena #coronavirus pic.twitter.com/e2BSEeCbTw
— Sarkarnama (@SarkarnamaNews) March 29, 2023
पाटण तालुक्यातील मरळी गावच्या श्रीनिनाईदेवीची यात्रा २८ मार्च या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी मंत्री शंभूराज देसाई सहकुटुंब यात्रेमध्ये सहभागी झाले होते. शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार चालू आहेत.