सोलापूरला गोहत्यामुक्त करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने महाआरती !
सोलापूर – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभागाच्या वतीने गोहत्यामुक्त सोलापूरसाठी महाआरती करण्यात आली. श्री सिद्धरामेश्वरांची पावन भूमी ही गोहत्यामुक्त व्हावी, तसेच गोरक्षकांना गोहत्या रोखण्यासाठी बळ मिळावे यासाठी दाजी पेठ येथील नागनाथ मंदिरात साकडे घालून महाआरती करण्यात आली. या वेळी सर्वश्री रंगनाथ बंकापूर, केतन शहा, गोपाल सोमाणी, वेणुगोपाल जिला, राजकुमार पाटील, नागेश बंडी, संजय जमादार, सतीश सिरसिला, शीतल परदेशी, प्रशांत परदेशी आदी गोरक्षक उपस्थित होते.