गोवा : चोर्ला घाटाकडे जाणारा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद
पणजी, ३० मार्च (स.प.) – गोवा-बेळगाव राज्य महामार्ग क्रमांक १ वरील दत्तवाडी, सांखळी जंक्शन ते चोर्ला घाटावरील गोवा राज्य सीमेच्या शेवटच्या टोकापर्यंत; सांखळी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील जंक्शन ते चोर्ला घाटावरील गोवा राज्य सीमेच्या शेवटच्या टोकापर्यंत, तसेच होंडा जंक्शन ते चोर्ला घाटावरील गोवा राज्य सीमेच्या टोकापर्यंत या मार्गांवर अवजड व्यावसायिक वस्तूंच्या वाहनांना २० सप्टेंबर २०२३ पर्यंत रात्री १० ते सकाळी ५ वगळता अन्य वेळी प्रवेश करण्यास जिल्हा दंडाधिकारी, उत्तर गोवा यांनी मनाई केली आहे.
(सौजन्य : Goan varta live) |