शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक !
सातारा, ३० मार्च (वार्ता.) – ‘शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची पावणेसहा लाख रुपयांची फसवणूक आणि अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अब्दुल राजकर रवाठार-शेख, तेजस्वी भास्कर चव्हाण आणि हिना अमन अफराज तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शासकीय नोकरी देतो, असे म्हणून अब्दुल शेखने तक्रारदार महिलेकडून रोख स्वरूपात आणि ऑनलाईन माध्यमातून ५ लाख ८७ सहस्र रुपये घेतले. तिला मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली आणि अत्याचारही केला’, असे तक्रारीत म्हटले आहे.