फराळाचे पदार्थ ‘सहज दिसतील’, असे ठेवणे टाळावे !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १७४
‘घरामध्ये बिस्किटे, शेव, चिवडा, फरसाण असे फराळाचे पदार्थ ‘सहज दिसतील’, असे ठेवल्यास जेव्हा त्या पदार्थांकडे लक्ष जाते, तेव्हा ते खाण्याचा मोह होतो. त्यामुळे अवेळी असे पदार्थ खाल्ले जातात. अवेळी घेतलेला आहार पचत नाही आणि आहार न पचल्यास रोग निर्माण होतात. त्यामुळे असे पदार्थ ‘सहज दिसतील’, असे ठेवणे टाळावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०२३)