नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील अनधिकृत दर्ग्यावर कारवाई न केल्यास तेथे श्री गणपति मंदिर उभारण्याची मनसेची चेतावणी
(दर्गा म्हणजे मुसलमानाच्या थडग्याच्या भोवती केलेले बांधकाम)
नवी मुंबई, ३० मार्च (वार्ता.) – नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील अनधिकृत दर्ग्यावर कारवाई न केल्यास तेथे श्री गणपति मंदिर उभारण्याची चेतावणी नवी मुंबई, मनसेने दिली आहे. मनसेने या विषयीचे निवेदन सिडको, ठाणे जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, कांदळवन विभागाचे अधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, करावे गाव, सेक्टर-४० येथे ‘मरीन नेव्ही युनिव्हर्सिटी’ असलेल्या टी.एस्. चाणक्य इमारतीजवळ अतिक्रमण करून दर्गा उभारण्यात आला आहे. शेजारी कांदळवन, समुद्रकिनारा आणि भाभा अणूसंशोधन केंद्र येथून टेहाळणीच्या टप्प्यात आहे. मुळातच हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतीसंवेदनशील आहे. तसेच हा दर्गा अनधिकृत असून मोठी जागाही बळकावलेली आहे.
नवी मुंबईतील दर्ग्याकडे मनसेचे बोट, हे अनधिकृत बांधकाम तोडा अन्यथा…; गजानन काळेंचा इशाराhttps://t.co/kZTo6B5Y8a #MNS #navimumbai #GajananKale #Dargahhttps://t.co/mYNT2GYHXZ
— Maharashtra Times (@mataonline) March 25, 2023
या अनधिकृत बांधकामाची १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.