देहलीच्या जहांगीरपुरीमध्ये रामभक्तांनी शांततेत काढली विनाअनुमती शोभायात्रा !
कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांनी नाकारली होती अनुमती !
नवी देहली – देहलीतील मुसलमानबहुल जहांगीरपुरी भागात ३० मार्च या दिवशी रामनवमीनिमित्त काढण्यात येणार्या शोभायात्रेला पोलिसांनी अनुमती नाकारली होती; तरीही येथे रामभक्तांकडून शांततेत शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यामध्येच पोलीस बंदोबस्त वाढवला होता. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत अनुमती नाकारली होती. गेल्या वर्षी हनुमान जयंतीच्या निमित्ताने याच परिसरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर मशिदीजवळ मुसलमानांनी आक्रमण केले होते.
सौजन्य : IndiaTV
संपादकीय भूमिका
|