भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मंदिरावरील भोंग्यांवरून उपविभागीय अधिकार्यांची मंदिर व्यवस्थापनाला नोटीस !
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील अवधपुरी भागामध्ये मंदिरांवरील भोंग्यांचा आवाज मोठा असल्याने उपविभागीय अधिकारी राजेश गुप्ता यांनी मंदिर व्यवस्थापनाला नोटीस बजावून भोंगे हटवण्यास सांगितले आहे. त्यामुळे गेल्या २ दिवसांपासून मंदिरातील भजन आणि कीर्तन भोंग्यांवरून ऐकवण्याचे थांबवण्यात आले आहे. लोकांकडून या संदर्भात तक्रारी आल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले आहे.
‘जेल में डालने की धमकी दी’: भोपाल में मंदिर में लाउडस्पीकर बजाने पर SDM ने संचालक को थमाई नोटिस, बोला प्रशासन – लोगों ने की शिकायत, दिया जा रहा धार्मिक रंग#Bhopal #MadhyaPradeshhttps://t.co/J0FtLFSate
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 29, 2023
याविषयी उपविभागीय अधिकारी राजेश गुप्ता म्हणाले की, मंदिराशेजारील नागरिक आणि नगरसेवक शक्ती राव यांनी जिल्हाधिकारी आणि आमच्या कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांचेही उल्लंघन होत होते. त्यामुळे नोटीस बजावण्यात आली.
संपादकीय भूमिकामशिदींवरील भोंग्यांविषयी तक्रारी केल्यावर उपविभागीय अधिकारी अशीच तत्परतेने कृती करतात का ? |