पनवेलजवळील बंबईपाडा येथे बांधकाम व्यावसायिक महिलेवर गोळीबार
असुरक्षित पनवेल !
नवी मुंबई – पनवेलजवळील बंबईपाडा येथे एका बांधकाम व्यावसायिक महिलेवर (वय वर्षे ३०) गोळीबार झाल्याची घटना २८ मार्चच्या सायंकाळी घडली. व्यवसायाच्या वादातून ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
पनवेलमध्ये बांधकाम व्यावसायिक महिलेवर गोळीबार#navimumbai #crime https://t.co/61wCJwXhkv
— LoksattaLive (@LoksattaLive) March 29, 2023
त्या महिला उरणमधील कोप्रोली येथे रहातात. कार्यालयातून घरी जातांना दुचाकीवरून आलेल्या २ जणांनी गाडी अडवून त्यांच्या डाव्या पायावर गोळी झाडली. गाडी चालवत असलेल्या त्यांच्या मावसभावाने त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयात नेले. या प्रकरणी पनवेल पोलीस ठाणे आणि गुन्हा शाखा अधिक अन्वेषण करत आहेत. नेरूळ परिसरामध्ये १५ दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाची ३ गोळ्या झाडून हत्या झाली होती. याच वेळी या परिसरामध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते.