दिवसातून २ वेळाच आहार घेऊन कृशता येत असेल, तर आवश्यकतेनुसार तिसरा आहार घ्यावा
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १७३
‘दिवसभर बैठी कामे करणारे, तसेच आवश्यकतेपेक्षा अधिक जाडी असणारे यांनी दिवसातून केवळ २ वेळाच आहार घेण्याने पुष्कळ लाभ होतात; परंतु काही वेळा वजन न्यून असणारे, तसेच भरपूर श्रम करणारे यांना केवळ २ वेळा आहार घेणे पुरेसे होत नाही.
आहार न्यून पडल्याने काहींचे वजन अजून न्यून होऊ लागते आणि कृशता (हाडकुळेपणा) येते. (२ वेळा आहार घेणार्या सर्वांनाच असे होते असे नाही. काही वेळा एखाद्याच्या प्रकृतीनुसार असे होऊ शकते.) असे होऊ लागल्यास आवश्यकतेनुसार तिसरा आहार घ्यावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०२३)
आतापर्यंतचे सर्व लेख वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकवर क्लिक करा ! |