तुळजापूर विकास आराखड्याचे जिल्हाधिकार्यांना सादरीकरण !
विकासकामांसाठी १ सहस्र १०० कोटी रुपये व्यय येण्याचा अंदाज
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – अनुमाने १ सहस्र १०० कोटी रुपये व्यय येणारा विकास आराखडा २७ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला. यामध्ये एका घंट्यात ६ सहस्र भाविकांना श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आठवडी बाजार येथे २६ एकर क्षेत्रावर भव्य वाहनतळ, तर घाटशीळ रस्ता वाहनतळमार्गे तुळजाभवानी मंदिरात प्रवेशाचे नियोजन केले आहे. महाद्वारातूनच मंदिराबाहेर पडण्याचा मार्ग असणार आहे. सल्लागार आस्थापन कन्स्ट्रक्टवेलच्या अभियंत्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना आराखड्याचे सादरीकरण केले.