वणी (यवतमाळ) येथील यात्रेत भर दिवसा शेतकर्याला मारहाण करून लुटले !
वणी (यवतमाळ), २९ मार्च (वार्ता.) – येथे होळीपासून बैलांची खरेदी-विक्री करण्यासाठी बैलबाजार भरतो. खेड्यातील शेतकरी बैल खरेदीसाठी येतात. सोमनाळा येथील शेतकरी अमोल कालेकर हे समवेत १० सहस्र रुपये घेऊन दुचाकीने यात्रेत आले. तेथे राहुल ठेंगणे याने त्याच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले. समवेतच्या बाईने आणि अल्पवयीन मुलाने त्या शेतकर्याला लाथा-बुक्यांनी मारून खिशातील १० सहस्र रुपये काढून घेतले आणि त्याचीच दुचाकी घेऊन ते तिघेही पळून गेले.
पोलिसांनी आरोपींना कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला. वणी परिसरात अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे; मात्र वणी पोलिसांची तत्परता वाढली आहे.