वाढणार्‍या उष्‍णतेमध्‍ये थेट थंड लादी वा कडप्‍पा यांवर झोपणे योग्‍य कि अयोग्‍य ?

‘वातावरणातील उष्‍णतेमध्‍ये वाढ होऊन आता उन्‍हाळा चालू झाला आहे. दुपारच्‍या वेळी किंवा रात्रीसुद्धा गरम होते, तेव्‍हा काही जण थंडगार लादी वा कडप्‍पा यांवर बसतात अथवा त्‍यावर काही न घालता थेट झोपतात. ‘असे केल्‍याने छान गार वाटेल’, असा विचार असतो; पण असे करणे हे अत्‍यंत अयोग्‍य आहे.

वैद्य समीर मुकुंद परांजपे

 आसन न घेता थेट लादी किंवा कडप्‍प्‍यावर बसल्‍याने किंवा झोपल्‍याने मणके, पाठ, कंबर, मांड्या, पाय इत्‍यादींमध्‍ये वेदना होतात.

सौजन्य : वैद्य समीर मुकुंद परांजपे

त्‍यामुळे कितीही उन्‍हाळा वाढला, तरी थेट लादीवर बसू अथवा झोपू नये. हा साधा-सोपा उपाय अवश्‍य करून त्‍याचा होणारा लाभ अनुभवा आणि संभाव्‍य त्रास टाळा !’

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१३.२.२०२३)

(संपर्कासाठी ई-मेल : drsameerparanjape@gmail.com)