१० मे या दिवशी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान
१३ मे या दिवशी मतमोजणी
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार १० मे या दिवशी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तसेच १३ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे. १३ एप्रिलपासून उमेदवार अर्ज भरू शकणार आहेत.