लिस्बनच्या इस्लामिक सेंटरमध्ये आक्रमण : दोन ठार, अनेक घायाळ
लिस्बन – पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथील इस्लामिक सेंटरमध्ये एका व्यक्तीने लोकांवर चाकूने आक्रमण केले. यामध्ये २ जण ठार, तर अनेक जण घायाळ झाले आहेत.
Portugal: Two killed, several injured in knife attack at Lisbon Ismaili centre@ShivanChanana brings you this report
Read more: https://t.co/DRQG56IckD pic.twitter.com/kiwHxjv48k
— WION (@WIONews) March 28, 2023
पोलिसांना या आक्रमणाविषयी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला कह्यात घेतले. हे आतंकवादी आक्रमण असल्याचा संशय आहे. आक्रमणकर्ता हा अफगाण शरणार्थी असून त्याला ३ मुले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.