कर्नाटकातील बेलुरू रथोत्सवात कुराण पठण करू नये; म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !
|
हासन (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील बेलुरू येथील ऐतिहासिक मंदिर श्रीचन्नकेशव रथोत्सवात कुराण पठण करू नये; म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी २८ मार्च या दिवशी मंदिराच्या मार्गावर आंदोलन केले. ४ आणि ५ एप्रिल या दिवशी हा रथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येथे रथोत्सवाच्या दिवशी कुराण पठण करण्याची परंपरा आहे. प्रतिवर्षी याला विरोध केला जातो; मात्र या वर्षी कुराण पठाण होऊ नये; म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटना अधिक कृतीशील झाल्या आहेत.
येथे आंदोलन चालू असतांना दुचाकीवर आलेल्या एका मुसलमान युवकाने ‘कुराण झिंदाबाद’ अशी घोषणा दिल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी त्याला अडवले. त्या वेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि संबंधित युवक यांच्यात वाद झाला. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या वेळी पोलिसांनी परिस्थिती बिघडू नये; म्हणून लाठीमार केला. तसेच संबंधित युवकाला कह्यात घेतले. घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकामोहर्रमच्या मिरवणुकीत श्रीमद्भगवत्गीतेचे पठण किंवा वेदमंत्रपठण कधीतरी होते का ? किंवा असे होऊ शकते का ? त्यामुळे हिंदूंकडून हा एकतर्फी सर्वधर्मसमभाव किती दिवस दाखवला जाणार ? |