ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील मंदिरावर खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ १ सहस्र हिंदूंनी काढला मोर्चा !
ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) – खलिस्तानवाद्यांनी येथील लक्ष्मीनारायण मंदिरावर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ येथील १ सहस्रहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन २६ मार्च या दिवशी मोर्चा काढला. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या हिंदूंनी हातात राष्ट्रध्वज घेतले होते. नुकतेच ब्रिस्बेन येथील भारतीय दूतावासावरही खलिस्तान्यांनी आक्रमण केले होते.
Salute to the over 1000 Australian Hindus hailing from Andhra Pradesh, Bihar, New Delhi, Fiji, Gujarat, Haryana, Karnataka, Kerala, Punjab, Maharashtra, Telangana, Uttar Pradesh & elsewhere who participated in the Australian Hindus Harmony Rally in Brisbane on 26 March. pic.twitter.com/EQBU4BmBar
— Australian Hindu Media (@austhindu) March 28, 2023
ऑस्ट्रलियातील हिंदूंच्या मंदिरांवर गेल्या काही कालावधीत झालेली आक्रमणे !
- जानेवारी २०२३ : मेलबर्न शहराजवळ असलेल्या मिल पार्क भागातील स्वामीनारायण मंदिरावर आक्रमण
- जानेवारी २०२३ : मेलबर्न शहरातीलच अॅल्बर्ट पार्कमधील इस्कॉनच्या हरेकृष्ण मंदिरात हिंदुविरोधी लिखाण करण्यात आले.
- मार्च २०२३ : ब्रिस्बेन येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरावर आक्रमण
संपादकीय भूमिकाब्रिस्बेन येथील हिंदूंचे अभिनंदन ! खलिस्तान्यांच्या विरोधात सर्वत्रच्या हिंदूंनी ब्रिस्बेनच्या हिंदूंचा आदर्श घ्यावा ! |