ग्रीसमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचे षड्यंत्र आखणार्या दोघा पाकिस्तान्यांना अटक !
एथेन्स (ग्रीस) – ज्यू धर्मियांच्या एका उपाहारगृहावर आक्रमण करण्यासाठी आलेल्या दोघा पाकिस्तानी जिहाद्यांना ग्रीक पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा सूत्रधारही पाकिस्तानीच असून तो इराणमधून सर्व कारवायांकडे लक्ष ठेवून आहे, अशी माहिती ‘दी वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रकाशित केलेल्या वृत्तात देण्यात आली आहे. ग्रीसमध्ये आतंकवाद्यांचे जाळे विणले जात असून त्याचे धागेदोरे इराणपर्यंत गेल्याने इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’ही ग्रीक पोलिसांना आतंकवाद्यांना पकडण्यासाठी साहाय्य करत आहे.
Greece terror attack averted, two Pakistani men arrested for plotting attack on Jewshttps://t.co/5u16kDclfb
— TIMES NOW (@TimesNow) March 29, 2023
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयातून यासंदर्भात नुकतेच एक वक्तव्य जारी करण्यात आले आहे. ‘ग्रीसमध्ये चालू असलेल्या आतंकवादी कारवाया या इराणकडून चालवण्यात येत असलेल्या एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे’, असे यात म्हटले आहे.
संपादकीय भूमिका‘पाकिस्तानी भूमी ही जिहादी आतंकवादाची जननी आहे’, ही वस्तूस्थिती सत्य ठरवणारा हा आणखी एक पुरावा ! |