पुद्दुचेरी येथे भाजप कार्यकर्त्याची हत्या !
पुद्दुचेरी – येथे राज्याचे गृहमंत्री नमचिवयम यांचे नातेवाईक आणि भाजपचे कार्यकर्ते सेंथिल कुमार यांची हत्या केली. सेंथिल कुमार बेकरी जवळ उभे असतांना दुचाकी गाड्यांवरून आलेल्या ७ जणांनी त्यांच्यावर गावठी बाँब फेकले. त्यामुळे सेंथिल कुमार खाली पडले. यानंतर आरोपींनी त्यांना काठ्यांद्वारे अमानुष मारहाण करून त्यांना ठार केले. ही घटना २६ मार्चच्या रात्री घडली. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेले नाही. या हत्येमागील कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
BJP worker Senthil Kumar bombed and hacked to death in Puducherry, seven assailants later surrender in courthttps://t.co/rIc1jm1Odv
— OpIndia.com (@OpIndia_com) March 27, 2023
संपादकीय भूमिकापूर्वी केवळ बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत होत्या; मात्र आता त्या सर्वत्र होत आहेत. हे रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने पावले उचलावीत ! |