देहलीतील जहांगीरपुरी या मुसलमानबहुल भागात रामनवमीच्या शोभायात्रेला पोलिसांनी नाकारली अनुमती !
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी देहली पोलिसांनी घेतला निर्णय !
नवी देहली – देहली पोलिसांनी उत्तर पश्चिमी देहलीतील मुसलमानबहुल भाग असलेल्या जहांगीरपुरी येथे रामनवमीनिमित्त ‘श्रीराम भगवान प्रतिमा यात्रा’ आयोजित करण्याची अनुमती नाकारली आहे. साहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे की, कायदा आणि सुव्यवस्थेला समोर ठेवत शोभायात्रेला अनुमती दिली जाऊ शकत नाही. या भागात गेल्या वर्षी १६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंती शोभायात्रेच्या वेळी हिंसा झाली होती. एका वरिष्ठ अधिकार्याने म्हटले की, रमझाननिमित्त नेताजी सुभाष प्लेस येथील पार्कमध्ये नमाजपठण करण्याची अनुमतीही देण्यात आलेली नाही.
जहाँगीरपुरी में नहीं निकलेगी ‘रामनवमी’ पर शोभा यात्रा’: दिल्ली पुलिस ने अनुमति देने से इनकार किया, 2022 में कट्टरपंथियों ने किया था श्रद्धालुओं पर हमला#Jahangirpuri #Delhi #RamNavamihttps://t.co/4Ea5lWPZmY
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 29, 2023
गेल्या वर्षी हनुमान जयंतीच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी घातला होता हैदोस !गेल्या वर्षी १६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीची शोभायात्रा जहांगीरपुरी येथील जामा मशिदीसमोरून शांततेने जात असतांना अचानक अन्सार शेख आणि त्याचे धर्मांध मुसलमान सहकारी यांनी शोभायात्रा थांबवून वाद घालायला आरंभ केला. त्याचे रूपांतर वादात होऊन अचानक शोभायात्रेवर दगडफेक चालू झाली. त्यामुळे घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. धर्मांध हे हिंदु भाविकांवर दगडफेक करण्यासह काचेच्या बाटल्याही फेकत होते. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता धर्मांध मुसलमानांनी वाहनांना आग लावण्यास आरंभ केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात ८ पोलीस कर्मचार्यांसमवेत एक नागरिक घायाळ झाला होता. या घटनेचा एक व्हिडिओ नंतर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता, ज्यामध्ये सोनू चिकना नावाचा एक धर्मांध मुसलमान यात्रेवर गोळीबार करत असल्याचे दिसत होते. |
संपादकीय भूमिका
|