जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे दशक हातातून निसटले ! – जागतिक बँक
वॉशिंग्टन (अमेरिका) – कोरोना महामारी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि अमेरिका अन् युरोप येथील आर्थिक क्षेत्रावर आलेले संकट या संपूर्ण दशकावर परिणाम करणारे ठरेल. त्यामुळे वर्ष २०३० पर्यंत प्रतिवर्षी केवळ २.२ टक्के आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. बँकेचे मुख्य अर्थतज्ञ इंदरमित गिल यांच्या मते, जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे दशक हातातून निसटले आहे !
बैंकिंग संकट ने बढ़ाई टेंशन#globalgrowth #worldbankhttps://t.co/8Uh02fhKAW
— AajTak (@aajtak) March 28, 2023
जागतिक बँकेने त्याच्या अहवालात पुढे म्हटले आहे की,
१. आर्थिक वाढीवर पडलेला नकारात्मक प्रभाव हा प्रचंड दारिद्य्र, उत्पन्नातील वाढते अंतर आणि हवामान पालट या सांप्रतकाळातील गंभीर संकटांना हाताळण्यासाठी आव्हान ठरत आहे. जर मंदी आली, तर ही परिस्थिती आणखी भयावह होईल.
२. जागतिक व्यापारात होणारी वाढ अत्यल्प आहे.
३. विकसनशील देशांचे सरासरी सकल देशांतर्गत उत्पादन हे पुढील ७ वर्षे ४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. गेल्या दशकात हे ५ टक्के, तर २०००-१० या दशकात ६ टक्के इतके होते.
४. महागाईवर ताबा, आर्थिक क्षेत्रात स्थिरता आणण्याचा प्रयत्न आणि अल्प कर्ज यांवर देशांनी प्रयत्न केल्यास जागतिक आर्थिक वाढ २.९ टक्क्यांपर्यंत तरी पोचेल, असेही जागतिक बँकेचे म्हणणे आहे.