फिलिपिन्समध्ये ३ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक
सिंगापूर – फिलिपाईन्समधील अन्वेषण यंत्रणांनी संयुक्त अभियानाद्वारे इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसीवरून ३ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक केली. इलोइलो शहरात ही कारवाई करण्यात आली. मनप्रीत सिंह (वय २३ वर्षे), अमृतपाल सिंह (वय २४ वर्षे) आणि अर्शदीप सिंह (वय २६ वर्षे) अशी या आतंकवाद्यांची नावे असून ते ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेशी संबंधित आहेत. हे तिघेही भारतीय असल्याचे सांगितले जात आहे.
3 suspected members of Khalistan Tiger Force arrested in the Philippineshttps://t.co/WlQyJSkO9X
— The Indian Express (@IndianExpress) March 29, 2023
संपादकीय भूमिका
खलिस्तानवाद जगभर फोफावत असतांना भारताने अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे, हे सकारने लक्षात घ्यावे ! |