बँकिंग क्षेत्रातील संकटांमुळे जागतिक मंदीची शक्यता ! – ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड बँकिंग ग्रुप
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – अमेरिका आणि युरोप येथील काही बँकांवर घोंघावणारे संकट जागतिक आर्थिक मंदी निर्माण करू शकते, अशी चेतावणी ‘ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड बँकिंग ग्रुप’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शेन इलियट यांनी दिली.
Australia and New Zealand Banking Group’s CEO said the latest turmoil in the global banking system had the potential to trigger a financial crisis though it was early to predict it could bring one similar to that in 2008 https://t.co/FDxYdHEyDy
— Reuters (@Reuters) March 27, 2023
इलियट पुढे म्हणाले की, सध्याची परिस्थिती ही वर्ष २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीच्या दिशेने जगाला घेऊन जाईल, असे आताची स्थिती पहाता म्हणणे धाडसाचे ठरेल; परंतु पाश्चात्त्य देशांतील बँकांची दु:स्थितीचा जागतिक स्तरावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दाट आहे. पाश्चिमात्त्य आर्थिक संस्थांनी हे लक्षात ठेवावे की, आता आलेले संकट लवकर जाणारे नाही.