अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते यांची सनद २ वर्षांसाठी रहित
मुंबई – राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांच्या आंदोलनात आणि बैठकीत अधिवक्त्यांचा काळा कोट अन् बँड घालून गेल्या प्रकरणी अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने शिस्तभंगाची कारवाई करून यांची सनद २ वर्षांसाठी रहित केली आहे. अधिवक्ते सुशील मंचरकर यांनी त्यांच्याविषयी तक्रार केली होती. या संदर्भात सदावर्ते मुंबई उच्च न्यायालयात गेले होते; पण उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.