कवितारूपी मानसपूजा स्वीकारूनी द्यावे आशीर्वचन ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
देवा (टीप), गोड तुझे रूप, गोड तुझे नाम ।
गुरुराया (टीप), नको जावया चारही धाम ॥ १ ॥
वर-खाली सभोवताली सारीच माया ।
तिला पार करण्या न्यून पडते ही काया ॥ २ ॥
देवा, तूच दिला आम्हा नामाचा आधार ।
त्यास घट्ट पकडूनी करू भवसागर पार ॥ ३ ॥
गात्रे शिथिल झाली, मन असू दे खंबीर ।
कायेच्या होडीवर तूच अससी स्वार ॥ ४ ॥
वेलीला आधार जसा वृक्षाचा ।
तसाच आधार तुझा साधकांना ॥ ५ ॥
‘घरास आश्रम समजावे’, हे तू आम्हा शिकवलेस ।
जाणीव ही ठेवूनी मनी आनंदाने जात आहेत दिवस ॥ ६ ॥
देवा, शिकवलेस तू आम्हा कराया मानसदर्शन ।
कवितारूपी मानसपूजा स्वीकारूनी द्यावे आशीर्वचन ॥ ७ ॥
टीप : देवा आणि गुरुराया हे शब्द सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उद्देशून लिहिले आहेत.
– सौ. नीलिमा सप्तर्षि (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८५ वर्षे), नागपूर (३.३.२०२३ )
|