पुढील ४-५ वर्षे जिवंत राहिलो, तर अन्य धर्मीयही ‘हरि हरि’ म्हणतील !
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे विधान !
जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील दरबारामध्ये बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी त्यांचे कटनी येथील मुसलमान भक्त तनवीर खान यांनी ३ दिवसांच्या रामकथेचे आयोजन केल्याचे सांगितले आहे.
धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, इतिहासात प्रथमच मुसलमान समाज ३ दिवसांची रामकथा आयोजित करत आहे. मी तनवीर खान यांना सांगितले की, तुमच्या सर्व समाजाला बोलवा. जर मी पुढील ४-५ वर्षे जिवंत राहिलो, तर अन्य धर्मीयही ‘हरि हरि’ असा जप करतील, असे विधानही त्यांनी केले.