मिरज येथे पतंजली योगपिठाचे योग शिबिर !
मिरज – मिरजेच्या अर्बन रिपब्लिक टाऊनशिपमधील योगधामामध्ये पतंजली योगपिठाद्वारे आयोजित ३ दिवसांच्या योग शिबिराचा प्रारंभ २८ मार्चला करण्यात आला. यात प्रतिदिन सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत योगाभ्यास घेण्यात येणार आहे. २९ मार्चला सूर्यनमस्कार स्पर्धा, तर श्रीरामनवमीच्या दिवशी होम-हवन, सूर्यनमस्कार स्पर्धेचा बक्षीस समारंभ, रक्तदाब आणि साखर पडताळणीचा अहवाल देण्यात येईल. हे शिबिर विनामूल्य असून त्याचा लाभ सर्व गटांतील महिला-पुरुष यांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.