खासगी शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ३ लाख ६६ सहस्रांहून अधिक अर्ज !
पुणे – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव असतात. यावर्षी ३ लाख ६६ सहस्र ५४८ पालकांनी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्जांची संख्या ८० सहस्रांहून अधिक आहे. ही अर्जसंख्या उपलब्ध जागांच्या साडेतीन पट आहे. अर्जांची पडताळणी होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशाची सोडत घोषित होण्याची शक्यता आहे.