१ एप्रिलपासून मंत्रालयीन कामकाजाचा वेग वाढणार !
मुंबई, २८ मार्च (वार्ता.) – मंत्रालय आणि शासकीय क्षेत्रीय कार्यालये येथील कामकाज गतीने व्हावे, यासाठी उन्नत संगणकीय कार्यप्रणाली चालू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. १ एप्रिलपासून मंत्रालयातील सर्व विभागांमध्ये ही उन्नत संगणकप्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रालयातील कामकाजाची गती वाढणार आहे.
सध्या मंत्रालयातील सर्व विभागांमध्ये ‘६.२’ ही ‘ई-ऑफिस कार्यवाही’ वापरली जात आहे. त्याऐवजी ‘७.०’ ही उन्नत प्रणाली अवलंबण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. मंत्रालयात कार्यरत झाल्यावर राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्येही ही कार्यप्रणाली लागू करण्यात येणार आहे.